माळशेज घाटातील वाहतूक पूर्ववत ; पर्यटकांना थांबण्यास मज्जाव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

ठाणे : माळशेज घाटात दरड कोसळल्याने चार दिवसांपासून बंद असलेली वाहतूक अखेर सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. 21) घाटात दरड कोसळल्याने कल्याण-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. चार दिवस घाटातील दरड हटविण्याचे काम सुरू होते. वाहतूक पूर्ववत झाली असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना घाटात थांबण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

संततधारेमुळे मंगळवारी पहाटे घाटात दरड कोसळली. प्रशासनाकडून युद्धस्तरावर काम करून दरडी हटवण्यात आल्या. दोन दिवस दाट धुके आणि जोरदार पावसामुळे कामात अडथळे येत होते. गुरुवारी पावसाचा जोर कमी झाल्याने वेगाने काम पूर्ण करून शुक्रवारी रात्रीपासून वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घाटमार्गात पोलिस आणि कर्मचारी तैनात केल्याची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली. 

पर्यटकांना प्रतिबंध 

खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील संवेदनशील असलेल्या परिसरात पर्यटकांना जाण्यास 31 ऑगस्टपर्यंत प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. सुट्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्यटक माळशेज घाटात गर्दी करतात. या दरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून प्रतिबंध घातल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: traffic Problems in Malsege Ghat are Solved