शाळा सुरु होण्याआधी कोरोनाचे शिक्षकांना प्रशिक्षण, पालिकेच्या सायन रुग्णालयाचा उपक्रम

शाळा सुरु होण्याआधी कोरोनाचे शिक्षकांना प्रशिक्षण, पालिकेच्या सायन रुग्णालयाचा उपक्रम

मुंबई:  लोकमान्य टिळक म्हणजेच पालिकेच्या सायन रुग्णालयातून शिक्षकांना सुरक्षित शाळा या विषयांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे.  सध्या कोरोनाने महामारीची स्थिती निर्माण केली आहे. 14 मार्च पासून शाळा बंद आहे. आता शाळा सुरु झाल्यास मुलांचे काय असा प्रश्न पालकांमध्ये उपस्थित केला जात आहे.  यामुळे पालिकेकडून सुरक्षित शाळेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. सायन रुग्णालयात या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

22 मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाले. या शाळा ही बंद पडल्या. स्थिती गंभीर असल्याने शैक्षणिक वर्षापासून एसओपी पद्धतीने सुरु ठेवल्या आहेत. तरीही शाळा सुरु केल्यानंतर पाल्यांचे काय अशी चिंता पालकांमध्ये आहे.  शाळेत गेल्यावर मुले सुरक्षित राहतील का असा प्रश्न कायम आहेच. यावर उपाय योजना करण्यासाठी सायन रुग्णालय अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या मार्गदर्शना खाली जन औषध विभागाच्या प्राध्यापिका डॉ. सीमा बनसोडे-गोखे यांच्यातर्फे पालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

ज्यात 150 शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. ते शिक्षक इतर शाळांच्या शिक्षकांना मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण देणार आहेत. याचा फायदा पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 6 लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.  सुरक्षित शाळा हे मोड्यूल शिवांक मेनन या तरुणाने तयार केले आहे. कोविड19 या महामारीतून मुलांना शिक्षण देण्यासाठी ही चांगली मार्गदर्शिका असल्याचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले. 

पालिका शाळेत येणारी मुले सर्व स्तरातून येतात. या उपक्रमातून त्यांना सुरक्षितता तर मिळेलच, शिवाय तज्ज्ञ आणि अभ्यासकांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पुढचे पाच दिवस महानगरपालिकेच्या शिक्षकांना सेफ शाळा या मॉड्युलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचे कार्य सुरू राहणार आहे.

सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, (आरोग्य) महापालिका

------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Training teachers Corona before start school initiative BMC Sion Hospital

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com