एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांची बदली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dyaneshwar Singh

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उप महासंचालक आणि पश्चिम झोनचे प्रभारी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडून मुंबई झोनचे प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांची बदली

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उप महासंचालक आणि पश्चिम झोनचे प्रभारी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडून मुंबई झोनचे प्रभारी पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी सचिन जैन याना पश्चिम झोनचे प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सिंह हे एनसीबीमधील विशेष दक्षता पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहतील. तसेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर लेह लडाख, चंदीगड आणि दिल्ली. या राज्यांसह पश्चिम विभागाचाही प्रभार सांभाळतील. ज्ञानेश्वर सिंह हे आयआरएस समीर वानखेडे आणि त्याच्या टीमचा तपास करणाऱ्या दक्षता पथकाचे प्रमुख होते.,समीर वानखेडे आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात तपास अधिकारी होते.

वानखेडेवर आरोपांची चौकशी

ज्ञानेश्वर सिंह यांनी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि इतरांच्या तपासकार्याची चौकशी केली होती. आपल्या अहवालात त्यांनी वानखेडे आणि इतर एनसीबी अधिकाऱ्यावर नियमांचे पालन न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर सिंह यांनी आपल्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचे वानखेडे यांनी केंद्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर तक्रारीत सांगितले होते.

तपास अहवालात काय

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दक्षता चौकशी केली होती. या तपासणीत एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 7 ते 8 इतर अधिकाऱ्यांविरुद्ध अनेक प्रक्रियात्मक त्रुटी निदर्शनास आल्या. समीर वानखेडे यांनी आयपीएस अधिकारी आणि एनसीबी डीडीजी ज्ञानेश्वर सिंह यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगात तक्रारही दाखल केली आहे, ज्याची चौकशी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

टॅग्स :MumbaiNCBTransfers