वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त 

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त 

मुंबई - अनेक दिवसांपासून रखडलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीला अखेर गृहविभागाला मुहूर्त मिळाला आहे. त्या अंतर्गत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या राज्याच्या अपर पोलिस महासंचालक (आर्थिक गुन्हे शाखा) या पदावर प्रभात कुमार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिस दलातही मोठी खांदेपालट करण्यात आली असून सह आयुक्त (गुन्हे शाखा) आशुतोष डुंबरे, सह आयुक्त (अर्थिक गुन्हे शाखा) व्ही. के. चौबे व सह पोलिस आयुक्तपदी (प्रशासन) संतोष रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबईच्या गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त संजय सक्‍सेना यांनाही पदोन्नती देऊन अपर पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) येथे बदली करण्यात आली आहे. सह पोलिस आयुक्त (प्रशासन, मुंबई) अर्चना त्यागी यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. त्या राज्य राखीव पोलिस दलाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची धुरा सांभाळणार आहेत. नवी मुंबई सह पोलिस आयुक्त प्रशांत बुरडे यांनाही उप महासमादेशक, गृहरक्षक दल व उप संचालक नागरी संरक्षण या पदावर बढती मिळाली आहे. याशिवाय राज्य राखीव पोलिस दलाचे अपर पोलिस महासंचालक संदीप बिष्णोई यांची अपर पोलिस महासंचालक (आस्थापना), तर अपर पोलिस महासंचालक सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षेचे अपर पोलिस आयुक्त धनंजय कमलाकर यांना अपर पोलिस महासंचालक (नियोजन व संनियंत्रण) या पदावर बदली करण्यात आली आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक सागरी सुरक्षा व व्हीआयपी सुरक्षा (मुंबई) या पदावर यशस्वी यादव यांना पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय दहशतवाद विरोधी पथक, मुंबई पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांना विशेष पोलिस महानिरीक्षक (नांदेड परिक्षेत्र), अपर पोलिस आयुक्त (सशस्त्र पोलिस दल) अश्‍वती दोर्जे यांना महाराष्ट्र पोलिस अकादमी, नाशिक संचालक पदावर बढती देण्यात आली आहे. 

छेरिंग दोर्जे यांना पदोन्नती 
मुंबईतील पश्‍चिम प्रादेशिक परिमंडळाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त छेरिंग दोर्जे यांनाही पदोन्नती देऊन त्यांची नाशिक परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त के. एम. एम. प्रसन्ना यांनाही पदोन्नती देऊन त्यांची नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी आर. डी. शिंदे यांना महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे या पदावर पदोन्नती मिळाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com