शहाड जलशुद्धीकरण केंद्र उल्हासनगर पालिकेला हस्तांतरित करा

Transfer the Shahad water purification center to Ulhasnagar Municipal Corporation
Transfer the Shahad water purification center to Ulhasnagar Municipal Corporation

उल्हासनगर : शहरापासून केवळ पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या उल्हासनगरला एमआयडीसीच्या शहाड जलशुद्धीकरण केंद्राकडून पाणी पुरवठा हा एक हजार लिटरमागे 8 रुपये दराने केला जातो. मात्र प्रचंड लांबच्या अंतरावर असणाऱ्या ठाणे-भिवंडी-मिराभाईंदर कडून साडेचार रुपये दर आकारला जातो. ही उल्हासनगर कडून केली जाणारी लूट असून ती थांवण्यासाठी आणि पालिकेचे स्वतःचे स्रोत असण्याकरिता शहाड केंद्राला पालिकेकडे हस्तांतरित करावे. अशी मागणी आज शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे निवेदनाद्वारे केली. तसेच उद्योगमंत्री सुभास देसाई यांचे देखील लक्ष वेधले.

ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख राजेंद्र साहू, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख जयकुमार केणी, नगरसेवक कलवंतसिंह सोहता, स्वप्नील बागूल, माजी नगरसेवक अंकुश म्हस्के, विभागप्रमुख सुरेश सोनवणे, शिवाजी जावळे, राजू माने, आदिनाथ कोरडे, अनिल मराठे, सागर उटवाल, उत्तरभारतीय सेनेचे के. डी. तिवारी यावेळी उपस्थित होते.

एमआयडीसीच्या मालकीच्या शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून पालिकेला 110 एमएलडी व पाले केंद्रामधून 50 एमएलडी पाणी पुरवठा होतो. मात्र त्यासाठी एक हजार लिटरमागे तब्बल 8 रुपये दर आकारला जातो. हाच दर ठाणे-भिवंडी-मिराभाईंदर साठी साडेचार रुपये आहे. शहाड केंद्र हे 1968 साली उभारण्यात आलेले आहे. गेल्या 30-35 वर्षांपासून या केंद्राकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या बदल्यात जे बिल उल्हासनगर कडून घेण्यात आलेले आहे, ते पाहता केंद्र उभारताना जो खर्च एमआयडीसीला आला त्याच्या 10 पट रकम ही पाणी बिलापोटी अदा झालेली आहे. ते पाहता शिवसेनेची सत्ता असताना 20 मार्च 2015 मध्ये शिवसेना नगरसेविका राजश्री चौधरी, राष्ट्रवादीचे नगरसेवक राजू जग्याशी यांनी स्वतःचे पाण्याचे स्तोत्र असावे यासाठी शहाड जलशुद्धीकरण केंद्र उल्हासनगर पालिकेकडे हस्तांतरित करावा असा ठराव महासभेत मांडला होता.

या ठरावाला सर्वानुमते मंजुरी मिळाल्यावर तो राज्यशासनाला पाठवण्यात आला होता. मात्र उल्हासनगरकरांच्या हिताच्या असलेल्या या ठरवाला शासनाने तीन वर्षांपासून विचारात घेतलेले नाही. ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पालिका शहाड जलशुद्धीकरण केंद्र घेणार असेल तर एमआयडीसीची बोलणी करून सकारात्मक निर्णय घेण्यात येणार. असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com