सेटलवाड यांना ट्रान्झिट जामीन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - "सबरंग' संस्थेमार्फत केंद्र सरकारकडून मिळवलेल्या निधीचा वापर न केल्याच्या आरोपाप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड तसेच त्यांचे पती जावेद आनंद यांना मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ट्रान्झिट जामीन अर्ज मंजूर केला. सेटलवाड आणि त्यांच्या पतीच्या अर्जावर न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्यापुढे सुनावणी झाली.

गुजरातमधील गोध्रा दंगलग्रस्तांसाठी आणि गरीब मुलांसाठी शिक्षण देण्यासाठी या दोघांनी "सबरंग' संस्थेमार्फत केंद्र सरकारकडून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मिळवला; मात्र त्याचा वापर केला नाही, असा आरोप त्यांच्यावर आहे. गुजरातमध्ये याबाबत फौजदारी फिर्यादही दाखल झाली आहे. त्यामुळे ट्रान्झिट जामीन मिळण्याची मागणी त्यांनी या अर्जाद्वारे केली होती. न्यायालयाने त्यांना 2 मेपर्यंत जामीन मंजूर केला आहे. गुजरातमध्ये शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने त्यांना दिले आहेत. 

Web Title: Transit bail to Setalvad