पारदर्शकतेसाठीच सुधारित दर!

high court
high court

मुंबई : दूरचित्रवाणी वाहिनीच्या दरांमध्ये पारदर्शकता आणि समानता निर्माण करण्यासाठीच सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे ग्राहकांना वाहिनी निवडीचा हक्क मिळू शकेल, असा खुलासा भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणकडून (ट्राय) मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. 

‘ट्राय’ने जारी केलेल्या निर्देशानुसार, टीव्ही वाहिन्यांच्या दरांवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. यामध्ये नेटवर्क कॅपॅसिटी फी १३० रुपयांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले आहे. या शुल्क मर्यादेमुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो, तसेच दरामध्ये सुसूत्रता येऊ शकते, असे ‘ट्राय’चे म्हणणे आहे. ‘ट्राय’च्यावतीने याबाबत न्यायालयात प्रतिज्ञापत्र बुधवारी दाखल करण्यात आले आहे. ‘ट्राय’ने सर्व वाहिन्यांना दिलेल्या निर्देशानुसार सुधारित दरांची माहिती १५ जानेवारीपर्यंत जाहीर करणे बंधनकारक होते; मात्र वाहिन्यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर आज सुनावणी झाली. ‘ट्राय’चा निर्णय मनमानी असून यामुळे वाहिन्यांच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप केला होता. मात्र यापूर्वी वाहिन्यांनी ग्राहकांवर अकारण जादा शुल्क आकारले होते. त्यामुळे केबल टीव्हीचे संपूर्ण आर्थिक गणित ग्राहकांच्या हितावर बाधा आणणारे आणि त्यांच्या पसंतीवर अतिक्रमण करणारे होते. तसे होऊ नये, यासाठी संबंधित निर्देश जारी केले आहेत, असा खुलासा ट्रायने केला आहे. नव्या शुल्कआकारणीमुळे ग्राहकांना वाहिन्या निवडीचा अधिकार मिळणार असल्याचा दावा केला आहे. सदर याचिकेवर पुढील सुनावणी ३० जानेवारीला होणार आहे. 

काय आहेत नवे दर?
यापूर्वी ‘फ्री टू एअर’ वाहिन्यांसाठी १३५ रुपयांची मर्यादा होती आणि त्यापुढील आवडीच्या वाहिन्यांसाठी वेगवेगळे दर होते. आता मात्र १३० रुपयांमध्ये किमान २०० वाहिन्या ग्राहकांना पाहता येणार आहेत. त्याशिवाय स्वतंत्र वाहिन्यांच्या दरामध्येही बंधने घालण्यात आली आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com