वाहतुकीचा इतिहास बेस्टच्या म्युझियममधून!

- किरण कारंडे
बुधवार, 18 जानेवारी 2017

आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच सादरीकरण

मुंबई - घोडे ओढत असलेल्या ट्राम, इलेक्‍ट्रिक ट्राम, ट्रामचे तिकीट, मुंबईशी संबंधित महत्त्वाच्या घटना, वाहतूक, विद्युत यंत्रणेत झालेली स्थित्यंतरे लवकरच ‘बेस्ट म्युझियम’मध्ये पाहता येतील. रस्ते वाहतुकीशी संबंधित असलेले देशातील हे पहिलेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्युझियम उभारण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

म्युझियममध्ये मुंबईचा रंजक इतिहास मांडण्यात येणार आहे. शहर आणि बेस्टचा १८७३ पासूनचा हा इतिहास असेल. घोडे ओढत असलेली ट्राम कशी धावायची, इलेक्‍ट्रिक ट्राम कशी होती आदी बारकावे येथे पाहता येतील. मुंबईतील महत्त्वाच्या घडामोडीही येथे दाखवल्या जातील. जुनी पेंटिंग, ॲण्टिक घड्याळे आदी बेस्टच्या सेवेशी संबंधित सर्व काही येथे असेल. म्युझियमच्या आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच याबाबतचे सादरीकरण महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागांसमोर करण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी सांगितले.

म्युझियमची जागा
सध्या बेस्टच्या आणिक डेपोत वस्तुसंग्रहालय आहे. याच जागेचा विकास करून तिथे प्रशस्त वस्तुसंग्रहालय तयार करण्याचे बेस्टचे नियोजन आहे. मोनो आणि मेट्रोने पर्यटकांना शक्‍य होईल, अशी ही जागा असल्याचे बेस्टचे म्हणणे आहे.

Web Title: transport history best musium