परिवहन मंत्री अनिल परब कोरोनामुक्त, ट्विट करत दिली माहिती

प्रशांत कांबळे
Sunday, 18 October 2020

अवघ्या काहीच दिवसात परब यांनी कोरोनावर मात केली असून, शनिवारी आपल्याला डिस्चार्ज मिळाला असून सुखरूप घरी पोहचलो असल्याचे परब यांनी ट्विट केले आहे.

मुंबई:  परिवहन मंत्री अनिल परब यांना कोविडची लागण झाली होती. त्यानतंर सोमवारी त्यांना लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काहीच दिवसात परब यांनी कोरोनावर मात केली असून, शनिवारी आपल्याला डिस्चार्ज मिळाला असून सुखरूप घरी पोहचलो असल्याचे परब यांनी ट्विट केले आहे.

परब यांची सोमवारी कोविड चाचणी केली होती. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना तात्काळ लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान उपचार सुरु केल्यानंतर प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आले होते. दरम्यान काहीच दिवसात परब यांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी परब यांनी ट्विट करून त्यांच्या कार्यकर्त्यांना आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने आपल्याला कमीतकमी वेळेत डिस्चार्ज मिळाला असून, सुखरूप घरी परतलो, असल्याचे सांगितले आहे. 

यानंतर काही दिवसांच्या विलगीकरणानंतर राहून आपल्या सेवेसाठी पुन्हा सज्ज होईन. आपण माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेम व शुभेच्छांचा मी आयुष्यभर ऋणी राहील असे ट्विट सुद्धा परब यांनी केले आहे. तसंच काही दिवसांच्या विलगीकरणानंतर मी आपल्या सेवेसाठी पुन्हा सज्ज होईन. आपण माझ्याप्रति दाखवलेल्या प्रेम व शुभेच्छांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, असं ट्विटही त्यांनी केलं आहे.

-----------------------

(संपादनः पूजा विचारे)

Transport Minister Anil Parab fight corona virus tweeted


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transport Minister Anil Parab fight corona virus tweeted