नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्था कोलमडली

अनधिकृत पार्किंगमुळे रहदारीत अडथळे येत आहेत
अनधिकृत पार्किंगमुळे रहदारीत अडथळे येत आहेत

नवी मुंबई : नियोजित नवी मुंबई शहरात वाहनचालकांच्या बेपर्वा बेशिस्तीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यात पार्किंगच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या महत्त्वाच्या परिसरात नो पार्किंगमध्ये पार्किंग केले जात आहे. वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, बेलापूर आणि नेरुळ परिसरातील रस्ते मोठे असले तरी वाढत्या अनधिकृत पार्किंगमुळे रहदारीत अडथळे येत आहेत. त्यामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यांना अडथळा शर्यत करावी लागत आहे. पालिकेची पार्किंगसंदर्भातील नियोजनशून्यता याला कारणीभूत असून, नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

शहराच्या काही भागांत वाहने खूप दिवसांपासून एकाच ठिकाणी उभी आहेत. नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग, सम-विषम पार्किंग, नो पार्किंग झोनच्या माध्यमातून पार्किंगला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासंदर्भातील सूचना देणारे फलकही ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि मनमानीपणे जिथे जागा मिळेल तिथे वाहने पार्क करतात. वाशी, कोपरी पामबीच मार्ग, सेक्‍टर १५ येथील अग्निशमन केंद्राच्या मागे, कोपरखैरणे या ठिकाणी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आलेली वाहने ही अनेक महिन्यांपासून एकाच ठिकाणी उभी असल्याने सध्या ही वाहने धूळखात पडली असल्याचे चित्र कोपरखैरणे परिसरात पहावयास मिळत आहे. शाळा परिसरातही नो पार्किंग फलकासमोर वाहने उभी केली जात आहेत. 

शहरात पार्किंगचा प्रश्‍न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. त्यामुळे दोन्ही प्रशासनाने नो पार्किंगमध्ये उभ्या वाहनांवर कारवाई करावी. तसेच दंडाची रक्कम वाढविल्यास अनधिकृत पार्किंगला आळा बसेल.
- महेश पाटील, नागरिक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com