कल्याणमध्ये बेशिस्त रिक्षा चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका 

kalyan.
kalyan.

कल्याण - नियम धाब्यावर बसवून कल्याण मध्ये रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत होते. यामुळे शहरात विविध ठिकाणी बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतूक कोंडी ही होत होती. आज बुधवार ता 30 जानेवारी रोजी कल्याण वाहतूक पोलिसांनी बेशिस्त रिक्षा चालका विरोधात धडक सुरुवात केली असून, 500 हुन अधिक रिक्षांची तपासणी करत 150 रिक्षा चालकाविरोधात दंडात्मक कारवाई केली. कागदपत्र आणि लायसन्स नसलेल्या 22 रिक्षा चालकांच्या रिक्षा जप्त केल्या आहेत. 

कल्याण शहरात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेत्यांचे दौरे आणि शहरात होणारी वाहतूक कोंडी ही दूर करण्यासाठी  वाहतूक पोलीस व्यस्त असल्याने बेशिस्त रिक्षा चालकांचे फावले होते. चौथे सीट घेणे, भर रस्त्यात रिक्षा उभी करून वाहतूक कोंडी करणे, गणवेश न घालणे, रिक्षाचे कागद पत्रे जवळ न ठेवने, कागदपत्र लायसन्स नसताना बेकायदेशीर रिक्षात प्रवासी वाहतूक करणे अश्या तक्रारी वाढल्या होत्या.

याची दखल कल्याण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी विशेष पथक स्थापन करत आज बुधवार ता 30 जानेवारी रोजी कल्याण रेल्वे स्टेशन, दुर्गाडी पूल, शहाड जकात नाका येथे अचानक रिक्षाची तपासणी सुरू केली. यात 500 हुन अधिक रिक्षाची तपासणी करत 150 हुन अधिक रिक्षा चालकाकडून दंड वसूल करण्यात आला. रिक्षा चालकाकडे लायसन्स आणि रिक्षाची कुठलेही कागदपत्रे नसताना बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या 22 रिक्षा चालकांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. यामुळे रिक्षा संघटना आणि रिक्षा चालकामध्ये चांगलीच खळबळ माजली होती. तर काही स्टेशन परिसरमधून पळ काढला होता. अनेक ठिकाणी मोकळे रस्ते पाहता ही कारवाई रोज व्हावी अशी मागणी कल्याणकर करू लागले आहेत.

अनेक ठिकाणी बंदोबस्त असल्याने मनुष्यबळ कमी असल्याने कारवाई थँडावली होती मात्र आगामी काळात ही कारवाई सुरू राहणार आहे. रिक्षा चालकासमवेत अन्य वाहन चालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन कल्याण वाहतूक शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गँभिरे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com