वाहतूकदारांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

मुंबई - डिझेल दरवाढ, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्श्‍युरन्सच्या प्रीमियममध्ये झालेल्या वाढीविरोधात देशभरातील मालवाहतूकदारांनी ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ गुड्‌स व्हेईकल ओनर्स असोसिएशनच्या (एसीओजीओए) सोमवारपासून पुकारलेल्या संपाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या संपादरम्यान अनुचित प्रकार घडला नाही. उद्यापासून (ता. 19) संपाची तीव्रता वाढण्याची शक्‍यता आहे.

वाहतूकदारांच्या एकूण उत्पन्नाच्या 60 टक्के भाग डिझेलसाठी खर्च होतो. पाच महिन्यांत डिझेलच्या दरात 17 टक्के वाढ झाली. तुलनेत वाहतूकदारांच्या भाड्यात वाढ झालेली नाही. या दरवाढीच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाला पहिल्या दिवशी 50 टक्के प्रतिसाद मिळाला. उद्यापासून हा संप 100 टक्के यशस्वी होईल, असा दावा ट्रक चालक-मालक संघटनेचे राज्य सचिव मोहिंदरसिंग घुरा यांनी केला.

Web Title: transporter strike response