मालवाहतूकदारांचा संप तूर्तास स्थगित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

मुंबई - डिझेल दरवाढीविरोधात देशभरातील मालवाहतूकदारांनी 18 जूनपासून पुकारलेला बेमुदत संप गुरुवारी स्थगित केला. ऑल इंडिया कॉन्फेडरेशन ऑफ गुड्‌स व्हेइकल ओनर्स असोसिएशन या संघटनेने हा संप पुकारला होता. सरकारने मात्र या संपाकडे दुर्लक्षच केले, असा आरोप संघटनेने केला आहे. दरम्यान, 27 जूननंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत मालवाहतूकदारांची बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले. डिझेलचे वाढते दर, टोल शुल्क आणि थर्ड पार्टी इन्श्‍युरन्स प्रीमियममध्ये झालेल्या भरमसाट वाढीविरुद्ध हा संप पुकारण्यात आला होता.

मालवाहतूकदार संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक बंगळूर येथे झाली. त्या वेळी संपाबाबत चर्चा झाली. केंद्रीय मंत्रालयाकडून संघटनेला संप मागे घेण्याची विनंती करण्यात आली.

Web Title: transporter strike stop