कचरा वेचणाऱ्या महिलांना रडण्याचा आवाज आला आणि...

कचरा वेचणाऱ्या महिलांना रडण्याचा आवाज आला आणि...


उल्हासनगर : मागच्या वर्षी ३० डिसेंबर रोजी वडोल गावात काही तासांचे अर्भक मिळाले होते. या घटनेला एक वर्ष होत आले असतानाच आज दत्त जयंतीच्या दिवशी उल्हासनगरातील सेंच्युरी रेयॉन कंपनी ग्राऊंडजवळील एका कचराकुंडीच्या शेजारी एक पुरुष जातीचे काही दिवसांचे अर्भक मिळाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेबाबत पोलिसांना कळविल्या नंतर पोलिसांच्या मदतीने त्याला रुग्णालायात दाखल केले असून अर्भकावर उपचार सुरू आहेत.

गुरूवारी सकाळी ९ वाजल्यानंतर कचरा वेचणाऱ्या महिला कुंडीजवळ गेल्या असता त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीतून अर्भकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे महिलांनी कचराकुंडीजवळ जावून पाहिले असता त्यांना तिथे एक अर्भक रडताना दिसले. त्यानंतर या महिलांना परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली.

कचराकुंडीजवळ अर्भक आढळल्यामुळे परीसरात खळबळ उडाली होती. दरम्यान परिसरातील नागरिक जमा झाल्यानंतर अर्भकाला पोलिसांच्या मदतीने मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉ. जाफर तडवी, डॉ. रवींद्र रोकडे यांनी अर्भकावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. अर्भकाची प्रकृती खालावलेली असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. तसेच हे  अर्भक साधारणतः १० दिवसांच्या आसपास वयाचे असल्यामुळे या घटनेबाबत नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली. तसेच कचरा वेचायला आलेल्या महिलांमुळे ही घटना उघड झाल्यामुळे या महिलांमुळे अर्भकाचे प्राण वाचल्याची चर्चा देखिल परिसरात नागरिक करत होते.

टायगर अभी जिंदा है
दरम्यान, ३० डिसेंबर २०१८ रोजी काळ्या पिशवीत बांधून केवळ मरण्याच्या उद्देशाने नाल्यात फेकलेले अर्भक समाजसेवक दाम्पत्य शिवाजी रगडे-जयश्री रगडे यांच्यामुळे जगले आहे. या दाम्पत्याने त्याच्या जन्मदात्यांना ‘टायगर अभी जिंदा है’ हे कळावे म्हणून अर्भकाचे नाव टायगर ठेवले आहे. याबाबत रगडे दाम्पत्यांचे परिसरात नागरिकांकडून कौतूक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com