अपंगांच्या डब्यातील प्रवास भोवला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलमध्ये अपंगांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या एक हजार 692 प्रवाशांवर तुर्भे आरपीएफ पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे सहा लाख 90 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे लोकलमध्ये लूटमारी, चोरी आणि विनयभंग यांसारखे गुन्हे करणाऱ्या 24 जणांनाही अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. गत सहा महिन्यांमध्ये आरपीएफ पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गतवर्षी आरपीएफने तीन हजार 280 गुन्हे दाखल करून सुमारे 15 लाखांचा दंड वसूल केला आहे. 

तुर्भे आरपीएफ पोलिसांनी लोकलमधील प्रवाशांना लुटणाऱ्यांविरोधात 11 गुन्हे दाखल करून 14 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तोन लाख चार हजाराचा ऐवज जप्त केला आहे. लोकलमधील प्रवाशांच्या सामानाची चोरी करणाऱ्यांवर पाच गुन्हे दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी आरपीएफने गत सहा महिन्यांमध्ये तीन गुन्हे दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर गत सहा महिन्यांमध्ये आरपीएफने तब्बल एक हजार 57 प्रवाशांना अपंगांच्या डब्यातून प्रवास करताना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख 12 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे घर सोडून पळालेले, हरवलेल्या अशा आठ मुलांना आरपीएफने ताब्यात घेऊन त्यांना पालकांकडे सुपूर्द केले आहे. लोकल प्रवासादरम्यान सापडलेले प्रवाशाचा एक लॅपटॉप, नऊ मोबाईल फोन आणि 35 बॅगा त्या-त्या प्रवाशांना परत केल्या आहेत. त्याशिवाय रेल्वे रुळालगतच्या फीश प्लेट चोरी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली. 

ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, तसेच त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आरपीएफकडून प्रयत्न केले जातात. त्यासाठी लोकल प्रवासादरम्यान उपद्रव करणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जाते. प्रवाशांनीही प्रवासादरम्यान सजग राहणे आवश्‍यक आहे. तसेच घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ आरपीएफ अथवा रेल्वे पोलिसांना द्यावी. 
- लोकेश सागर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुर्भे आरपीएफ 

सहा महिन्यांतील कारवाई 
तिकीट दलाली- 2 गुन्हे दाखल, 2 आरोपींना अटक 
फेरीवाले- 250 फेरीवाल्यांवर कारवाई, 2 लाख 10 हजाराचा दंड वसूल 
भिकारी- 23 भिकाऱ्यांवर कारवाई, 17 हजार 200 रुपयांची वसुली 
अपंगांच्या डब्यातून प्रवास करणारे- 1057 वर कारवाई, तीन लाख 12 हजारची वसुली. 

Web Title: Travel in the train compartment of the disabled