आश्रमशाळेतील 8 विद्यार्थीनींवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार

भगवान खैरनार
बुधवार, 28 मार्च 2018

मोखाडा : नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यातील देवगाव येथील कन्या आश्रमशाळेतील 8 विद्यार्थीनींना मंगळवारी (ता. 27) रात्री पोटात दुखून मळमळू लागले. याच अवस्थेत या मुली शाळेत कोणीही शिक्षक नसल्याचे त्रास सहन करत होत्या. या घटनेची खबर मिळताच, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे व त्यांच्या पत्नीने त्यांना धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथेही डाॅक्टर नसल्याने शिपाई आणि कर्मचार्यांनी या मुलींवर जुजबी ऊपचार केले.

मोखाडा : नाशिक जिल्ह्यातील ईगतपुरी तालुक्यातील देवगाव येथील कन्या आश्रमशाळेतील 8 विद्यार्थीनींना मंगळवारी (ता. 27) रात्री पोटात दुखून मळमळू लागले. याच अवस्थेत या मुली शाळेत कोणीही शिक्षक नसल्याचे त्रास सहन करत होत्या. या घटनेची खबर मिळताच, श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे व त्यांच्या पत्नीने त्यांना धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथेही डाॅक्टर नसल्याने शिपाई आणि कर्मचार्यांनी या मुलींवर जुजबी ऊपचार केले. तेथून या मुलींना मोखाडा तालुक्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले, मात्र, प्रभावी ईलाज होत नसल्याने त्यांनी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील देवगाव आदिवासी कन्या आश्रमशाळेत इयत्ता 1  ते 12 पर्यंत निवासी शिक्षणाची व्यवस्था असुन सुमारे 450 विद्यार्थीनी शिक्षण घेत आहेत. ऐन वार्षिक परिक्षेच्या तोंडावर येथील  साक्षी अस्वले, ज्योती वारे, नंदिनी जाखेरे, चिऊ सराई, शकुंतला गोहिरे, मंजुळा हंबीर, निर्मला पारधी आणि कमल गोहिरे या 8 मुलींना मंगळवारी रात्री पोटात दुखून येत मळमळू लागले. मात्र, शाळेत कोणीही जबाबदार शिक्षक नसल्याने या मुली तिन तास हा त्रास सहन करत होत्या. या घटनेची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे व त्यांच्या पत्नीने या सर्व मुलींना धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले मात्र, तेथेही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने शिपाई आणि परिचारीकेने या विद्यार्थीनींवर जुजबी ईलाज केले. मात्र, त्रास काही केल्या थांबत नसल्याने या सर्व विद्यार्थीनींना मोखाड्यातील खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथे उपचार करूनही मुलींचा त्रास आटोक्यात येत नसल्याने त्यांना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

Web Title: Treatment for 8 students of Nashik District Civil Hospital in Nashik