मीरा भाईंदर पालिकेडून दूषित पाण्यावर प्रक्रिया! 2 कोटीच्या खर्चाला मंजूरी 

मीरा भाईंदर पालिकेडून दूषित पाण्यावर प्रक्रिया! 2 कोटीच्या खर्चाला मंजूरी 

भाईंदर  ः उत्तन येथील घनकचरा प्रकल्पातून निघणारे "लिचेड'(दुषित पाणी) शेतजमिनीत पसरत असून जमिनीची सुपीकता कमी होत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे या लिचेड वर प्रक्रिया करण्याकरिता मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून प्रकल्प उभारण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या महासभेत यासाठी 1 कोटी 66 लाख 72 हजार 500 रुपयांच्या खर्चास आर्थिक आणि प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तर याठिकाणी 4 प्लांट उभारण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. 

मिरा भाईंदर महानगरपालिकेकडून उत्तन भागात घनकचरा प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या भागात 13 लाख क्‍युबिक मीटर पर्यंतचा घनकचरा जमा होतो. त्यामुळे या घनकचऱ्यातून साधारण 30 हजार लीटर लिचेड निघत आहे. हा लिचेड जमा करण्याकरिता प्रशासनामार्फेत पूर्वी टाकीची निर्मिती करण्यात आली होती. परंतु या लिचेड वर प्रक्रिया होत नसल्यामुळे तो भरून वाहत असून परिसरातील लगत असलेल्या शेत जमीनीत तसेच समुद्रात पसरत आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

आता याच लिचेडवर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेकडून 50 क्‍युबिक मीटर लांबीचा "आरो मेम्बरने' प्रकल्प उभारण्यात येणार असून सुमारे 75 टक्के लिचेड वर प्रक्रिया होणार आहे. तसेच शिल्लक राहणारे पाणी बांधकाम आणि उद्यान विभागात झाडांना पाणी टाकण्याकरिता करण्यात येणार आहे. याकरिता गेल्या आठवड्यात पार पडलेल्या महासभेत 1 कोटी 66 लाख 72 हजार 500 रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. 

लिचेड वरील प्रकल्प उभारण्याकरिता प्रशासनाकडून प्लांट ची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र घनकचरा प्रकल्प हा डोंगर भागात उभारण्यात आल्यामुळे कचऱ्यातून निघणारा लिचेड हा सर्वत्र बाजू पसरत आहे. त्यामुळे या ठिकणी किमान प्लांट उभारण्याची मागणी आम्ही करीत आहोत
 बर्नाड डिमेलो
शिवसेनेचे शहरप्रमुख

Treatment of contaminated water by Mira Bhayander Municipality 2 crore sanctioned 

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com