उरणमध्ये या प्रजातीच्या माकडाला जीवदान 

या माकडाला जीवदान दिले
या माकडाला जीवदान दिले

उरण : तालुक्‍यातील कळंबुसरे येथील एनडीआर या कंपनीच्या रोहित्राला विजेचा झटका लागल्याने जखमी झालेल्या "हनुमान लंगूर' या प्रजातीतील माकडाला निसर्गप्रेमींनी जीवदान दिले. कंपनीच्या आवारात माकडांना विजेचा धक्क बसल्याच्या तीन पेक्षा अधिक घटना घडल्या आहेत. 

विजेच्या झटक्‍याने माकड जखमी झाल्याची माहिती वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेचा सदस्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन माकडाला ताब्यात घेतले. या वेळी प्राणी मित्र विवेक केणी, बंटी शेळके, विनीत मढवी उपस्थित होते. माकडावर उरण पशूवैद्यकीय येतील परिचारिक प्रमोद मोकल यांनी प्रथोमचार केले. त्यानंतर उरण वन क्षेत्र अधिकारी शशांक कदम यांना घटनेची माहिती देण्यात आली. या माकडाला इंद्रायणी डोंगराच्या कुशीत सोडण्यात आले. 

हे वाचा : हिंदमातासाठी नवा प्रयोग

उरण तालुक्‍यात वृक्षसंपदा वाढत आहे. त्यामुळे या भागात येणाऱ्या पक्षी- प्राण्यांचे प्रमाण वाढत आहे. गावांमध्येही वृक्षराजी वाढली असल्याने त्यांचा गावांमध्येही ओढा वाढला आहे, असे वन्यजीव निसर्ग संरक्षण सर्पमित्र संस्थेच्या विवेक केणी यांनी सांगितले. 
... 
कर्नाळा परिसरात साधारणत: तीन प्रकारची माकडे आढळतात. त्यात एक कॉमन माकड आहे. हे सर्वत्र आढळते. कळंबुसरे येते जीवदान देण्यात आलेले माकड हे हनुमान लंगूर प्रजातीतील आहे. साधारण या जंगलातून दुसऱ्या जंगलात स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे त्यांची संख्या किती असेल हे सांगू शकत नाही. 
- प्रदीप चव्हाण, वनक्षेत्र अधिकारी, कर्नाळा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com