पालिकेच्या नेस्को जंबो कोविड केंद्रात 10 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार

पालिकेच्या नेस्को जंबो कोविड केंद्रात 10 हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार

मुंबई:  बीकेसीनंतर पालिकेच्या नेस्को जंबो कोविड केंद्रात 10 हजारांहून अधिक कोविड रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे, नेस्को कोविड केंद्राने ही 10 हजारांच्या पुढचा टप्पा गाठला असून इथे असलेल्या सोयीसुविधांचा रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याची माहिती जंबो नेस्को कोविड केंद्राच्या प्रभारी डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली आहे.

2 जून या दिवशी या केंद्राला सुरू झाली होती आणि आताच्या घडीपर्यंत केंद्रात 10 हजार रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यापैकी 8,547 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सद्यपरिस्थितीत 146 रुग्ण दाखल आहेत. दरम्यान, गुरुवारी नव्याने दाखल झालेल्या 9 रुग्णांमुळे जंबो कोविड केंद्रांने 10 हजार रुग्णांचा टप्पा गाठला आहे. 

सध्या नवे रुग्ण रुग्ण दाखल होण्याची संख्या कमी झाली आहे. सध्या 146 रुग्णांवर उपचार सुरू आहेय. सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात दर दहा दिवसांनी 1000 रुग्ण दाखल होत होते, आता 11 नोव्हेंबरपासून आपण 9000 वर होतो आणि गुरुवारी 10, हजारांवर पोहोचलो आहोत. हा फरक 45 दिवसांचा आहे, असे डॉ. अंद्राडे यांनी सांगितले आहे. 

पोस्ट कोविड ओपीडीत ही चांगला प्रतिसाद

नेस्को कोविड केंद्रांत काही दिवसांपूर्वीच पोस्ट कोविड ओपीडी सुरु करण्यात आली आहे. या ओपीडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीला फक्त 5 रुग्ण आले होते. आता प्रत्येकदिवशी 35 ते 40 रुग्ण येत आहेत. त्यात थकवा, श्वासासंबंधी आजार, भूक मंदावणे आणि अशक्तपणा अशी लक्षणे आढळून येत आहेत. अनेकांना निद्रानाशेची ही समस्या आहे. डिप्रेशनसाठी रोज ऑनलाईन समुपदेशन 10 ते 2 या वेळेत सुरू आहे. प्रत्येक सेशन हे 45 मिनिटांचा असतो आणि त्याने रुग्णाला खूप लाभ झाला आहे आणि त्यांना खूप चांगला अनुभव आला आहे. 

योगा शिबीरे ही सुरु

तसेच योगाचे शिबीरही सुरू आहेत. फिजिओथेरपिस्ट त्यांना उपचार देत आहेत. हे सेशन रोज सुरु आहेत. तसेच जे रुग्ण 20 ते 20 दिवस बेडवर होते. त्यांना थकवा किंवा ज्यांनी चालण्याचा आत्मविश्वास गमावला आहे अशा लोकांना ते चांगल्या प्रकारे उपचार देत आहेत. त्यांना खूप आत्मविश्वास आणि चांगलं वाटत आहे. 

गोरेगाव असणाऱ्या जंबो कोविड केंद्रात सध्या रुग्णांची वाढती संख्या आहे. कारण, इथे असलेल्या सुविधांमुळे फक्त मुंबईतीलच नाही तर राज्यातून ही रुग्ण दाखल होत आहेत. 

आयसीयूची ही सुविधा

कोविड केंद्रांत नुकतीच आयसीयूची सुविधा पुरवली जात आहे. ज्यात आतापर्यंत 388 रुग्णांवर उपचार देण्यात आले आहेत. त्यानुसार, आता जंबो कोविड केंद्रांत 10 हजार रुग्णांवर उपचार देण्यात आले आहेत.

------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Treatment more than 10 thousand patients bmc Nesco Jumbo Covid Center

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com