सामान्य नागरिकांनाही रेल्वे रुग्णालयांमध्ये उपचार

सामान्य नागरिकांनाही रेल्वे रुग्णालयांमध्ये उपचार

मुंबई : राज्यातील रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये आता प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पात्र असलेल्या नागरिकांना वैद्यकीय उपचार घेता येणे शक्‍य होणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य विभागातील सामंजस्य करारामुळे रेल्वे आणि रुग्णालयाचा उपयोग सामान्य जनतेला होणार आहे.

येत्या आठवड्यापासून ही योजना सुरू होणार आहे. रेल्वेच्या रुग्णालयांमध्ये रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय उपचार दिले जातात; परंतु आता रेल्वे हॉस्पिटलमध्ये सामान्य नागरिक उपचार घेऊ शकणार आहेत. त्यासंबंधीची अधिसूचना १ नोव्हेंबर रोजी काढण्यात आली असून राज्यातील रेल्वेच्या सर्व रुग्णालयांना याबाबत 
कळवण्यात आले आहे. 

web title :Treatment of ordinary citizens in railway hospitals

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com