ऐरोलीतील पदपथांवर छाटलेल्या फांद्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

नवी मुंबई - ऐरोली विभागात सोसायटी पदाधिकाऱ्यांनी आवारातील छाटलेल्या झाडांच्या फांद्या सोसायटीशेजारच्या पदपथावर रचून ठेवलेल्या आहेत. एक महिन्यापासून त्या पदपथावर पडल्या असल्यामुळे पादचाऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे.

पावसाळ्यात लोंबकळलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी महापालिकेतर्फे सोसायट्यांना आवाहन करण्यात आले होते. तसेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या व एका बाजूला झुकलेल्या झाडांच्या फांद्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे छाटल्या जात आहेत; परंतु सोसायटीच्या आवारातील झाडांच्या लोंबकळलेल्या फांद्या छाटण्याचे काम संबंधित सोसायट्यांनी करायचे आहे. तसेच छाटलेल्या फांद्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश उद्यान विभागाने त्यांना दिले आहेत; मात्र तरीही ऐरोली सेक्‍टर आठ, १५ व १६ मधील पदपथांवर सोसायट्यांनी छाटलेल्या फांद्या एक महिन्यापासून पडलेल्या आहेत. 

Web Title: tree branches On the footpath