वृक्षतोडीचे निकष काय? - उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 एप्रिल 2018

मुंबई - ठाणे व मुंबईतील झाडे तोडण्याचा निर्णय संबंधित महापालिका आयुक्त कोणत्या निकषांच्या आधारे घेतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज केली.

मुंबई - ठाणे व मुंबईतील झाडे तोडण्याचा निर्णय संबंधित महापालिका आयुक्त कोणत्या निकषांच्या आधारे घेतात, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने आज केली.

मेट्रोसह विविध विकासकामांसाठी मुंबई आणि ठाण्यात मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात येत आहेत. या कामांची परवानगी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांकडे असतात. त्यानुसार 25 झाडे तोडण्याचा निर्णय पालिका आयुक्त घेऊ शकतात; मात्र हा निर्णय घेताना आयुक्त कोणत्या कार्यपद्धतीचा वापर करतात, त्यासाठी तज्ज्ञांचे मत घेतात का, झाडांबाबतचा अहवाल घेतात का आदी प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केले. तसेच आयुक्त याबाबत तज्ज्ञ नसल्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेताना कशा प्रकारे निकष लावले जातात याचा तपशील दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई आणि ठाणे महापालिका आयुक्तांना दिले.
पर्यावरणप्रेमी झोरू बथेना यांनी केलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

Web Title: tree cutting Criteria high court