वृक्ष प्राधिकरणावर बेकायदा नियुक्‍त्या; उच्च न्यायालयातील याचिकेत आरोप

High-Court-Mumbai
High-Court-Mumbai

मुंबई - मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये तज्ज्ञ व्यक्तींऐवजी नगरसेवकांचीच बेकायदा नियुक्ती करण्यात आली आहे, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या आरोपांचा खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.

वृक्षछाटणीबाबत सातत्याने लढा देणाऱ्या पर्यावरणप्रेमी झोरू बथेना यांनी न्यायालयात तशी याचिका केली आहे. वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये किमान सात तज्ज्ञ जाणकारांसह सात नगरसेवकांची नियुक्ती करणे अपेक्षित असते. या समितीची सदस्यसंख्या 15 हून अधिक असता कामा नये. मात्र, या नियमाला महापालिकेने छेद देऊन, 13 नगरसेवकांची नियुक्ती केल्याचा दावा बथेना यांनी याचिकेत केला आहे. या याचिकेचा उल्लेख न्या. शंतनू केमकर व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे बुधवारी (ता. 3) करण्यात आला. महापालिकेच्या वतीने या आरोपांबाबत खुलासा करण्यासाठी सोमवारपर्यंतचा अवधी मागण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com