मिळालेल्या मतांइतके वृक्ष लावणार - खासदार राहुल शेवाळे

MP-Rahul-Shewale
MP-Rahul-Shewale

मुंबई - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एक अभिनव संकल्प केला आहे. लोकसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली, तेवढी वृक्षलागवड करणार असल्याची घोषणा करत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्शच समोर ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना चार लाख २४ हजार ९१३ मते मिळाली होती. मतांच्या या संख्येइतकेच वृक्ष येत्या पाच वर्षांत लावण्याचे त्यांनी ठरवले आहे.

‘प्लांट अ होप’ अशा नावाने पुढील पाच वर्षे राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात मुंबईतील विविध सामाजिक संस्थांनाही सहभागी करून वृक्षारोपणाची नवी चळवळ उभी केली जाणार आहे. दहा जूनला या उपक्रमाची शेवाळे यांच्या हस्ते सुरवात होणार आहे. मुंबईतील विविध सामाजिक संस्था, शाळा-महाविद्यालये, खासगी कंपन्या, गृहनिर्माण सोसायट्या, तसेच सामन्य नागरिक या सर्वांच्या माध्यमातून पाच वर्षांत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com