नवी मुंबईत रोपलागवड सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

तुर्भे - नवी मुंबई महापालिकेने वन महोत्सवानिमित्त एक लाख १८ हजार रोपांची लागवड करण्याचे निश्‍चित केले आहे. या नियोजनबद्ध मोहिमेचा प्रारंभ रविवारी (ता. १) झाला. 

ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात प्राईड ऑफ इंडिया म्हणून नावाजलेल्या ताम्हण रोपांची लागवड या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. पावणे एमआयडीसीमधील मुख्य रस्त्यावरील रुंद दुभाजकात चाफ्याची रोपे लावण्यात आली. या रोपांना नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी तयार होणारे कुंभको सिटी कम्पोस्ट हेच खत वापरले जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी विशेषत्वाने नमूद केले.

शहर हरित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने रोपलागवडीसह त्यांचे संवर्धन हे कर्तव्य समजून या मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

वृक्षरथातून रोपवाटप 
रोपलागवडीमध्ये ताम्हण, चाफा याप्रमाणेच कांचन, शंकासुर, आकाश नीम, कदंब, वड, पिंपळ, आंबा, फणस, काजू, आवळा, बदाम अशा विविध रोपांचा समावेश असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त नितीन काळे यांनी दिली. वन महोत्सवानिमित्त उद्यान विभागामार्फत एक वृक्षरथ तयार करण्यात आला आहे. त्याद्वारे जुलैमध्ये परिसरात रोपे दिली जाणार आहेत.

Web Title: Tree planting in Navi Mumbai starts