दुष्काळाच्या गर्तेतील आदिवासींना दिलासा 

दुष्काळाच्या गर्तेतील आदिवासींना दिलासा 

मोखाडा : दिवाळीच्या नैवेद्यासाठी ही धान्य हाती नाही. संपूर्ण मोखाडा तालुका दुष्काळाच्या सावटाखाली असल्याने, दिवाळी साजरी कशी होणार, या चिंतेने ग्रासलेल्या आदिवासींच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. महानगर टेलिफोन निगम, स्थानिय लोकाधिकार समिती व कामगार संघ या शिवसेनेच्या संघटनेने खासदार व संघटनांचे अध्यक्ष अरविंद सावंत यांच्या हस्ते मोखाड्यातील अतिदुर्गम नाशेरा, शिरसगाव, आडोशी आणि आमले गावातील एक हजार कुटुंबांना दिवाळीचे गोड फराळ देऊन दिलासा दिला आहे. त्यामुळे येथील आदिवासींच्या चेहर्‍यावर हसू फुलले आहे. सतत 21 वर्षे हा ऊपक्रम शिवसेना अखंडीत राबवीत आली आहे. 

कुपोषणाच्या विळख्यात अडकलेल्या मोखाड्याला या वर्षी पावसाने ही दगा दिल्याने, संपूर्ण तालुका दुष्काळाच्या सावटाखाली आला आहे. मात्र, शासनाने दुष्काळाच्या यादीत मोखाड्याला डावलून, आदिवासींच्या जखमांवर मिठ चोळले आहे. यंदा हाती नवीन धान्य नाही. त्यामुळे दिवाळी सणं कसा साजरा होणार, या चिंतेने ग्रासलेल्या आदिवासींच्या मदतीला शिवसेना धाऊन आली आहे. 

शिवसेनेच्या महानगर टेलिफोन निगमच्या स्थानिय लोकाधिकार समिती व कामगार संघाने नाशेरा, शिरसगाव - आडोशी आणि जेथे विज नाही, रस्ता नाही अशा आमले गावात दोन किलोमीटर पायी चालत जाऊन तेथील आदिवासींना करंजी, चकली, शंकरपाळी, चिवडा आणि लाडू हे दिवाळी चे फराळ सुमारे एक हजार आदिवासी कुटुंबांना देऊन त्यांची दिवाळी गोड केली आहे. स्थानिय लोकाधिकार समिती व कामगार संघाचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत आणि संघटनेच्या पदाधिकार्यानी आदिवासींना ऐन दुष्काळाच्या दाहकतेत दिलासा दिला आहे. त्यामुळे आदिवासींच्या चेहर्‍यावर हसू फुलले आहे.

शिवसेना प्रमुख हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये सुरू केलेला हा ऊपक्रम आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ऊध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली  21  वर्षापासून आम्ही स्थानिय लोकाधिकार समिती व कामगार संघाच्या माध्यमातून आदिवासीं सोबत दिवाळी साजरी करत असुन त्यांच्या सुख दुखाःत सहभागी होत असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी सांगितले आहे. 

दुष्काळी तालुका जाहीर करण्यासाठी प्रयत्न करणार
दिवाळी सणाला शेतात पिकवलेली चवळी, कंदफळे आणि नवीन पिकलेले धान्य याचा नैवेद्य दाखवण्याची, येथील आदिवासींची परंपरा आहे. मात्र, या वर्षी हाती काहीच लागले नसल्याने, आदिवासींच्या घरात चवळी आणि दिवे लावण्यासाठी गोडेतेल देणार नसल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी सांगून आदिवासींना दिलासा दिला आहे. तसेच मोखाडा तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणुन जाहीर करावा ही बाब पक्षप्रमुख ऊद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना सांगणार असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमास कामगार संघाचे सरचिटणीस दिलीप जाधव, स्थानिय लोकाधिकार समिती चे कार्याध्यक्ष प्रकाश शिरवाडकर, सरचिटणीस दिलीप (बाळा) साटम, पालघर जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, तालुका प्रमुख अमोल पाटील,  माजी सभापती सारीका निकम, नगरसेविका बेबीताई बरफ यांसह स्थानिय लोकाधिकार समिती व कामगार संघाचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com