जव्हार मधील कुंडाचापाडा येथील आदिवासींचा पाण्यासाठी संघर्ष

भगवान खैरनार
रविवार, 29 एप्रिल 2018

संपूर्ण विहिरीला घेराव घालून, विहीरीच्या कठड्यावर चढून, ऐकमेकाना धक्के देत आदिवासी महिला जीव पणाला लावून पाणी मिळवत आहेत. 

मोखाडा - दिवसभर मोलमजुरी सोडून केवळ पाण्यासाठी धावाधाव करणे हा ऐकमेव ऊपक्रम जव्हार मधिल कुंडाचापाडा येथील आदिवासींचा बनला आहे. "मानसी केवळ विस लिटर पाणी" या सरकारी नियमाचा फटका बसत असल्याने, येथील आदिवासी पाण्याचा टॅंकर येताच, पाणी मिळविण्यासाठी विहिरीवर जीवघेणी स्पर्धा करत आहेत. संपूर्ण विहिरीला घेराव घालून, विहीरीच्या कठड्यावर चढून, ऐकमेकाना धक्के देत आदिवासी महिला जीव पणाला लावून पाणी मिळवत आहेत. 
                   
कुंडाचापाडा हे गाव जव्हार-नाशीक रस्त्यालगतच असुन रस्त्याला लागुनच असुन येथे मोठी विहिर असुनही टंचाई निर्माण होते, या विहिरीचे पाणी मार्च नंतर संपते त्यामुळे येथे प्रतिवर्षी शासना द्वारे टॅँकरे ने पाणी पुरवठा केला जातो, ज्यावेळी टॅँकर येतो, त्यावेळी शेकडो महिला डोक्यावर-खांद्यावर हांडा, कळशी, बादली घेऊन पाणी भरण्यासाठी गर्दी करतात, व पुर्ण विहिराला घेराव घालून पाणी बाहेर काढून हांडे भरतात, ही कसरत दररोज तेथील आदिवासी महिलांना करावी लागत आहे. शासनाच्या नियमाप्रमाने प्रतिमानसी 20 लीटर पाणी दिले जाते. एवढं पाणी पुरत नसल्याने, येथील आदिवासी महिला जादा पाणी मिळावे म्हणून विहीरीच्या कठड्यावर ऊभे राहुन पाणी मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा करतात. या दरम्यान, महिलेचा तोल जाणे, चक्कर येण्याचा धोका निर्माण झाला असून, कोणत्याही क्षणी अघटित घटना घडण्याची भिती निर्माण झाली आहे.

तसेच तालुक्यातील कौलाळे, श्रीरामपुर व कासटवाडी गावठानात तर जांभळीचामाळ, खरंबा, कुंडाचापाडा व पिंपळपाडा या सात गाव पाड्यात सध्या दोन टॅँकरने रोज एकवेळ पाणी पुरवठा केला जात आहे. तर आपटाळे, कापरीचापाडा, मोरगिळा, शिवाकोरड्याची मेट, मोगरावाडी या पाच नविन गाव पाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात  मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Tribal struggle for Water in Kundachapada in Jawhar