Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयी यांना मूक मोर्चा द्वारे श्रध्दांजली

नंदकिशोर मलबारी 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुरबाड शहरातील झेंडा नाका ते तिन हात नाका असी फिरत ही मूक रॅली म्हसा रोडवरील भाजपाच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी माजी आमदार दिंगबर विशे, तालुका अध्यक्ष जयंत सुर्यराव यांनी श्रध्दांजली वाहिली.

सरळगांव (ठाणे) - माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील महान विभूती अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी मुरबाड तालुका भाजपाच्या वतीने मूक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रध्दांजली वाहताना उपस्थित नेते म्हणाले की, दुरदर्शिता आणि अदभूत भाषाशैली, प्रेमळ व्यक्तिमत्व आमच्या स्मृतीमध्ये चिरंतर राहील.

मुरबाड शहरातील झेंडा नाका ते तिन हात नाका असी फिरत ही मूक रॅली म्हसा रोडवरील भाजपाच्या कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी माजी आमदार दिंगबर विशे, तालुका अध्यक्ष जयंत सुर्यराव यांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी मुरबाड नगर पंचायतीचे मा. उपानगराध्य नारायण गोंधळी, सरचिटणीस नितिन मोहोपे, शहर अध्यक्ष रूपेश गुजरे, लियाकत शेख, दिपक खाटेघरे, रविंद्र देसले, नगरसेवक विकास वारघडे, कस्तूरी पिसाट, जोती गोडांबे, जोती देहरकर, मोहन दुगाडे, व मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
          
देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली लिहिण्यासाठी भाजपाच्या वतीने मूक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 

Web Title: Tribute to Atal Bihari Vajpayee at saralgaon thane