100 सूर्यनमस्कार घालून टिळकांना अभिवादन 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे शताब्दी पुण्यस्मरण उद्यापासून (ता. 1) सुरू होत आहे. यानिमित्त डोंबिवलीचे शैलेंद्र रिसबुड सूर्यनमस्कार घालून लोकमान्य टिळक यांना आदरांजली वाहणार आहेत. मुंबई पोलिस मुख्यालयाच्या समोरील सरदार गृह येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत रिसबूड 100 सूर्य नमस्कार घालणार आहेत. 

लोकमान्य टिळक यांनी मुंबईतील सरदार गृह येथे अखेरचा श्वास घेतला. त्या ठिकाणी हा उपक्रम व्हावा, अशी संकल्पना "केसरी'च्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना खरे यांनी मांडली. त्यानुसार रिसबुड हा उपक्रम करणार आहेत. लोकमान्य टिळक यांनी मुंबईत केशवजी नाईकांच्या चाळीत मुंबईतील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. या घटनेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रिसबुड यांनी लोकमान्यांना 1 हजार 500 सूर्य नमस्कारांची मानवंदना दिली होती. 25 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या गणेशोत्सव कालावधीत दररोज सूर्यनमस्कार त्यांनी घातले होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हाही रिसबुड यांनी 300 सूर्यनमस्कारांचा उपक्रम सादर केला होता. एका दिवसात सकाळी आणि संध्याकाळी सूर्यनमस्कार त्यांनी घातले होते. याप्रमाणेच रिसबुड यांनी याआधी एकूण बारा वेळा सूर्यनमस्कारांचा हा उपक्रम केला असून उद्याचा तेरावा उपक्रम आहे. 

लोकमान्य टिळक यांना व्यायामाची आवड होती. त्यांनी शरीर सुदृढ करण्यासाठी कॉलेज जीवनात एक वर्ष गॅप घेतली होती, म्हणूनच लोकमान्यांना आदरांजली वाहण्यासाठी, ही चांगली संकल्पना वाटली. त्याचबरोबर तरुणांमध्ये देशी व्यायामाचे महत्त्व रुजवावे हासुद्धा एक हेतू आहे. 
- शैलेंद्र रिसबूड 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tribute to lokmanya tilak