अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील कथित लीक चॅट व्हायरल

सुमित बागुल
Saturday, 16 January 2021

या प्रकरणावरून आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय.

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यात आणि बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे माजी अधिकारी, माजी CEO पार्थो दासगुप्ता यांच्यातील काही Whats App चॅट लीक झाले आहेत असं बोललं जातंय. कथित लीक झालेले हे whats app चॅट सामाजिक माध्यमांवर व्हायरल देखील झालेत.

दरम्यान, प्रशांत भूषण यांनी अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यातील संभाषणाचे कथित Whats App चॅट्स ट्विटरवरून प्रसिद्ध केले आहेत.

Unmasking Happiness पोस्ट कोविडमध्ये जपा फुफ्फुसांचे आरोग्य

या प्रकरणावरून आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधलाय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. TRP घोटाळ्यात भाजप आणि केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केलाय. त्यामुळे यावर भारतीय जनता पक्षाने आता यावर स्पष्टीकरण द्यावे असं सचिन सावंत म्हणालेत.

TRP case Allegedly chats of arnab goswami and ex CEO Partho Dasgupta goes viral


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TRP case Allegedly chats of arnab goswami and ex CEO Partho Dasgupta goes viral