वाड्यात गॅस्ट्रोची साथीच्या निर्मूलनासाठी शर्थीचे प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 मे 2018

तालुक्‍यातील चेंदवली गावात ग्रॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आल्याच्या गंभीर घटनेची तत्काळ दखल घेण्यात आली आहे. वाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. सोनावणे यांनी पथकासह चेंदवली येथे पाहणी केली आणि विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून पाणी शुद्धीकरण युद्धपातळीवर सुरू केले आहे.

वाडा : तालुक्‍यातील चेंदवली गावात ग्रॅस्ट्रोचे रुग्ण आढळून आल्याच्या गंभीर घटनेची तत्काळ दखल घेण्यात आली आहे. वाडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. डी. सोनावणे यांनी पथकासह चेंदवली येथे पाहणी केली आणि विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून पाणी शुद्धीकरण युद्धपातळीवर सुरू केले आहे. हे पथक गावात घराघरात जाऊन ग्रॅस्ट्रोच्या रुग्णांची पाहणी करत आहेत. गॅस्ट्रोची साथ वाढू नये यासाठी सर्वतोपरी आरोग्य विभाग दक्षता घेत असल्याचे डॉ. सोनावणे यांनी सांगितले. 

बुधवारी (ता. 2) तालुक्‍यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यांतील 35 नागरिकांना विहिरीचे दूषित पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली होती. त्यातील गिरिजा दांडेकर (वय 65) ही महिला दगावली, तर विविध ठिकाणी उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती आता स्थिर आहे.

गॅस्ट्रोचा नवीन रुग्ण वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव यांनी दिली. तिन्ही पाड्यांना या एकाच विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. ही विहीर अनेक वर्षांपासून स्वच्छ केलेली नसल्याने तिच्यात गाळ साचून तिचे पाणी दूषित झाले होते. 

Web Title: Trying to eradicate Gastros extradition in Wada