मातांना क्षयाचा वाढता धोका 

नेत्वा धुरी 
मंगळवार, 10 जुलै 2018

मुंबई- मुंबईत यंदा एप्रिल ते जूनमधील 40 मातामृत्यूंपैकी सर्वाधिक नऊ हे क्षयरोगाने झाल्याची नोंद आहे. एकट्या जूनमध्ये यापैकी पाच मृत्यू झाले. ही धोक्‍याची घंटा समजून महापालिकेने या मृत्यूंची पुनर्तपासणी सुरू केली आहे. 

मुंबई- मुंबईत यंदा एप्रिल ते जूनमधील 40 मातामृत्यूंपैकी सर्वाधिक नऊ हे क्षयरोगाने झाल्याची नोंद आहे. एकट्या जूनमध्ये यापैकी पाच मृत्यू झाले. ही धोक्‍याची घंटा समजून महापालिकेने या मृत्यूंची पुनर्तपासणी सुरू केली आहे. 

या नऊपैकी एका प्रकरणाची चौकशी पालिकेच्या आरोग्य विभागाने पूर्ण केली आहे. इतर आठ प्रकरणांची तपासणी बाकी आहे, असे सूत्रांनी सांगितले. क्षयाने बाधित महिलांची गर्भधारणा ही अत्यंत धोक्‍याची मानली जाते. कित्येकदा महिला आपल्या आजारपणाची पूर्ण माहिती देत नाही, तर कित्येकदा उशिराने तपासण्या सुरू करतात. त्यांना वाचवणे कठीण होऊन बसते, अशी प्रतिक्रिया पालिका रुग्णालयांतील स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिली. एखादी महिला एड्‌सबाधित असेल, तर तिलाही क्षयरोगाची संभावना असते. वरील नऊपैकी एका महिलेला एचआयव्हीची बाधा होती. तपासाअंती तिलाही क्षयरोग असल्याचे निष्पन्न झाले. 2014 नंतर गेल्या वर्षी शहरात क्षयाचे रुग्ण वाढल्याने पालिका आरोग्य विभाग या मृत्यूंची पुनर्तपासणी करत आहे. 

वर्ष/ मातामृत्यू/ प्रमुख कारण 
2014-15/ 319/ हेपेटायटिसमुळे सर्वाधिक 42, दुसऱ्या स्थानी क्षयरोगामुळे 39. 
2015-16/ 311/ हेपेटायटिसमुळे सर्वाधिक 44, पाचव्या स्थानी क्षयरोगामुळे 19. 
2016-17 / 288 / हेपेटायटिसमुळे सर्वाधिक 49, सातव्या स्थानी क्षयरोगामुळे 10. 
2017-18 / 240/ सर्वाधिक 36 सेप्सिसमुळे, दुसऱ्या स्थानी क्षयरोगाने 26. 

यंदा नऊ मातामृत्यूंमागे क्षयरोग हे प्रमुख कारण दिसून येत आहे. या प्रकरणांची पुनर्तपासणी होणार आहे. 
- डॉ. मंगला गोमारे, उपआरोग्य अधिकारी, कुटुंब कल्याण व माता-बालक आरोग्य, मुंबई महापालिका 

Web Title: tuberculous risk for mothers