तुकाराम मुंढेंचा शिवसेनेला दणका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

नवी मुंबई -  नवी मुंबई महापालिकेची तिजोरी हातातून जाऊ नये, यासाठी लोकप्रतिनिधींच्या "आयुक्त हटाव' मोहिमेत सामील झालेल्या शिवसेनेला पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी (ता. 18) दणका दिला.

निवासी भूखंडाचा विनापरवानगी वाणिज्यिक वापर केल्याचा ठपका ठेवत पालिकेच्या स्थायी समितीचे सभापती शिवराम पाटील व त्यांच्या पत्नी अनिता पाटील यांचे नगरसेवकपदच मुंढे यांनी रद्द केले. या कारवाईमुळे शिवसेनेच्या हातातून स्थायी समिती जाण्याची शक्‍यता आहे. बेकायदा बांधकामांमुळे पालिकेने नोटीस बजावलेल्या नवी मुंबईतील नगरसेवकांचेही त्यामुळे धाबे दणाणले आहे.

पाटील दाम्पत्याने कोपरखैरणेतील त्यांच्या मालकीच्या भूखंडावर उभारलेल्या इमारतीत बेकायदा बांधकाम केल्याची तसेच परवानगीशिवाय या निवासी भूखंडाचा वाणिज्यिक वापर सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेच्या नगररचना विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत संबंधित इमारतीत नकाशातील रचनेनुसार काम केले नसल्याचे तसेच तेथील वाणिज्यिक वापरही नियमांचे उल्लंघन करून होत असल्याचे आढळले होते.

माझे तसेच पत्नीचे नगरसेवकपद रद्द केल्याबाबतची कायदेशीर नोटीस अद्याप मिळालेली नाही. माझ्यावरील कारवाईची माहिती मला प्रसारमाध्यमांकडून मिळते, हे चुकीचे आहे. ही आकसापोटी केलेली कारवाई आहे.
- शिवराम पाटील, स्थायी समिती सभापती, नवी मुंबई पालिका

Web Title: Tukaram Mundhe of the Shiv Sena to bump