भयपटांचे दिग्दर्शक तुलसी रामसे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

मुंबई - ‘पुरानी हवेली’, ‘विराना’, ‘बंद दरवाजा’ या प्रकारच्या भयपटांचे दिग्दर्शक तुलसी रामसे (वय ७७) यांचे शुक्रवारी दुपारी निधन झाले. छातीत दुखत असल्याने त्यांना कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कमी खर्चात भयपट बनवण्यात रामसे यांची मक्‍तेदारी होती. ७० ते ८० च्या दशकात रामसे यांनी रामसे ब्रदर्स या नावाखाली एकापाठोपाठ अनेक थरारपट दिग्दर्शित केले. १९४७  मध्ये फाळणीनंतर रामसे यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. ‘दो गज जमीं के निचे’ हा रामसे ब्रदर्सचा पहिला भयपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

Web Title: Tulsi Ramase Passed Away