हापूस आंबा येतोय आवाक्‍यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

तुर्भे - अचानक वाढलेले तापमान हापूस आंब्याच्या वाढीला पूरक ठरल्याने कोकणातील हापूस आंब्याची एपीएमसीच्या घाऊक बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

दराचा मागोवा घेतल्यास हापूस लवकरच सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येण्याची चिन्हे दिसत आहेत. मागील आठवड्यात हापूस हजार ते १२०० प्रतिडझनने विकला जात होता; परंतु आवक बऱ्यापैकी वाढल्याने आता मोठ्या हापूसचा प्रतिडझन दर ७०० ते ८०० रुपये; तर सर्वांत छोट्या हापूसचा दर २५० ते ४०० रुपये आहे. 

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड या तिन्ही जिल्ह्यांतून सध्या वाशीतील फळ बाजारात प्रतिदिन सरासरी दोन ते तीन हजार हापूस आंब्याच्या पेट्या येत आहेत. गेल्या आठवड्यात हापूस हजार ते बाराशे प्रतिडझनने विकला जात होता; परंतु यंदा गुढीपाडव्यानंतर वाढणारी आवक व्यापारी स्पर्धेमुळे लवकर वाढू लागली आहे.

दक्षिणेतील हापूस कोकणापेक्षा स्वस्त
मागणी व पुरवठा यातील तफावतीमुळे किमती कमी होऊ लागल्या आहेत; परंतु कोकणातील हापूस आंब्यापेक्षा कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून आलेला दक्षिण भारतीय हापूस आंबा तुलनेने स्वस्त आहे. आता डझनामागे बऱ्यापैकी मोठा हापूस ७०० ते ८०० रुपये; तर सर्वांत छोटा हापूस २५० ते ४०० रुपये आहे. तसेच दाक्षिणात्य हापूस २५० ते ३०० रुपये आहे. शिवाय बदामी, तोतापुरी, लालबाग या ‘गरिबांचा हापूस’ आंब्यांचीही आवक वाढली आहे, असे व्यापारी किरण चिखले यांनी सांगितले.

Web Title: turbhe news hapus mango