निद्रिस्त सरकारला उलथवून टाका - विश्वनाथ पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

वाडा - पालघर सह संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला असताना यातील काहीच तालुके दुष्काळ म्हणून जाहीर केले. दुष्काळाबाबत सरकारने दुजाभाव केला. निसर्गाचा कोप व सरकारचे चुकीचे धोरण या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे. शेतक-यांच्या पिकाला भाव नाही. तोट्यात चाललेली शेती शेतकरी वर्षानुवर्ष करतो. कर्जबाजारी झालेले शेतकरी आत्महत्या करताहेत मात्र शेतक-यांकडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. अशा शेतकरी विरोधी व निद्रिस्त सरकारला उलथवून टाका असे आवाहन शेतकरी नेते विश्वनाथ पाटील यांनी केले.

विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसान आक्रोश यात्रेला आज विक्रमगडमध्ये सुरवात झाली असून, तालुक्यातील खानिवली येथे सायंकाळी चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

ते पुढे म्हणाले की, बारा टक्के असणा-या मराठा समाजाला सरकारने सोळा टक्के आरक्षण दिले आहे. तर 388 जातींचा समावेश असणा-या ओबीसींना फक्त 19 टक्के आरक्षण हा कुठला न्याय असा सवाल उपस्थित करून अन्याय करणा-या सरकारला ओबीसी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सरकार नवनवीन प्रकल्प आणून शेतक-यांच्या जागा घेत आहे. गॅस वाहिन्या, रस्ते, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या असे अनेक नवनवीन प्रकल्प सरकार आणत आहे. आता तर बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा व नागपूर मुंबई समृद्धी मार्ग असे नवनवीन प्रकल्प आणून शेतक-यांच्या जागा घेत आहे. यात शेतकरी देशोधडीला लागत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने नोटाबंदी करून लहान उद्योजकांना उध्वस्त केल्याचा आरोप चौकसभेत केला. सन 1972 साला पेक्षाही भीषण दुष्काळ यावर्षी पडला आहे. मोखाडा मध्ये आत्ताच 80 टॅकर सुरू केले आहेत. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळाची स्थिती असताना आमचे पालकमंत्री करताहेत काय ? अशी टिका आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे नाव न घेता केली. शेतक-यांचा आक्रोश निद्रिस्त सरकार पर्यंत पोहचण्यासाठी ही यात्रा काढल्याचे त्यांनी सांगुन सरकारवर टिकेची झोड उठवली. 

युवा शेतकरी नेते प्रफुल्ल पाटील म्हणाले, की यावर्षी तालुक्यात दोन हजार मिलीमीटर पाऊस पडला असून ऑगस्ट मध्ये 64, सप्टेंबर 72 मिलीमीटर असा पाऊस पडला असतानाही सरकारने तालुक्याला दुष्काळ ग्रस्त यादीतून डावलले असल्याचा आरोप करत दुष्काळी परिस्थिती पाहता शीतपेये व लोखंड बनवणा-या कारखान्याचा पाणी पुरवठा बंद करा अन्यथा आम्हाला तो बंद करावा लागेल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेखा पष्टे, सुरेश पवार यांची भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात सरकारवर कडाडून टिका केली. आक्रोश यात्रेत शेतकरी नेते पराग पष्टे, एकनाथ वेखंडे, निलेश भोईर, रोहीदास पाटील आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते 

Web Title: Turn down the government - Vishwanath Patil