"नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा... छैया बघायला तयार रहा"

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

मुंबई : येत्या काही दिवसात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईवर वर्चस्व स्थापन करण्याची सगळ्या पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आता आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरु झालं आहे. 

मुंबई : येत्या काही दिवसात नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईवर वर्चस्व स्थापन करण्याची सगळ्या पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आता आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरु झालं आहे. 

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर खंडणीखोर आणि गद्दार असल्याचा आरोप केला होता. त्यावर गणेश नाईक यांनी चांगलंच प्रत्युत्तर दिलं होतं. "यह तेरे बस की बात नहीं..जा अपने बाप को बुला.. और नाम पुछा तो बोल गणेश नाईक," असा खोचक टोला जितेंद्र आव्हाड यांना लगावला होता. मात्र त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. ट्विटरवर राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना पाहायला मिळतायत.  

हेही वाचा: Yes बँक ग्राहकांनी  आधी 'हे' करा..नाहीतर पुढे अजून त्रास होईल 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड:

"मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, तर गणेश नाईकांनी कथकल्ली सुरू केली. अजून तर मी १०० वेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे. नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा... छैया बघायला तयार राहा #गद्दार_गणेशनाईक," असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय.

काय म्हणाले होते गणेश नाईक:

माझ्यावर खंडणीखोर असल्याचा आरोप केला जात आहे. पण माझ्याविराधात आतापर्यंत एकही तक्रार दाखल नाही. मी जर खरंच खंडणीखोर आहे तर खुशाल पुरावे घेऊन केस करा.आता निवडणूक आल्यानंतर ज्यांची कुवत आहे तेही बोलतील ज्यांची कुवत नाही तेही बोलतील. एकच म्हणतो, यह तेरे बस की बात नहीं...जा अपने बाप को बुला....और नाम पुछा तो बोल गणेश नाईक", अशी टीका गणेश नाईक यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली होती. 

हेही वाचा: कोरोनामुळे आपल्या फुप्फुसांना नक्की होतं काय?..अत्यंत महत्वाची माहिती.. 

यामुळे आता नवी मुंबईच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. आता जितेंद्र आव्हाडांच्या या टीकेवर गणेश नाईक काय उत्तर देतात हेच बघणं महत्वाचं असणार आहे.  

tweeter war between jitendra avhad and ganesh naik on navi mumbai elections


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tweeter war between jitendra avhad and ganesh naik on navi mumbai elections