जितेंद्र आव्हाड का म्हणतायत, "मी दर १० वर्षांनी बाप बदलत नाही"

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 March 2020

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्वच मोठ्या राजकीय पक्षांमध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी चढाओढ लागली आहे. राष्ट्रीवादीतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये चांगलाच ट्विटर वॉर बघायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. 

धक्कादायक ! कोरोनाने घेतला २ लाख कोंबड्यांचा जीव... 

मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. सर्वच मोठ्या राजकीय पक्षांमध्ये ही निवडणूक जिंकण्यासाठी चढाओढ लागली आहे. राष्ट्रीवादीतून नुकतेच भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये चांगलाच ट्विटर वॉर बघायला मिळत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहे. 

धक्कादायक ! कोरोनाने घेतला २ लाख कोंबड्यांचा जीव... 

जितेंद्र आव्हाड यांनीं काही दिवसांआधी गणेश नाईक यांना गद्दार आणि खंडणीखोर म्हंटलं होतं. त्यावर उत्तर देताना "ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल", असं आव्हाडांवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र आता त्यावर आव्हाड यांनी पुन्हा ट्विट करून गणेश नाईकांना खडे बोल सुनावले आहे. तसंच "कोणी मुंबईमधून, ठाण्यामधून नवी मुंबईचा कारभार करू शकतं नाही. आधी त्यांनी तिकडचा विकास करून दाखवावा", असंही गणेश नाईक यांनी म्हंटल होतं. मात्र यावरून या दोघांमध्ये ट्विटरयुद्ध सुरु झालं.

यावर काय म्हणाले जितेंद्र आव्हाड:

"मला दर १० वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही. जितेंद्र आव्हाड स्वतःचे डायलॉग स्वत: मारतो, कोणाचे चोरलेले डायलॉग मारत नाही. मी स्वत: स्क्रिप्ट लिहितो, स्वत: डायलॉग मारतो आणि स्वत:च्या आवाजात मारतो. मी एकदाच नवी मुंबईत गेलो तर गणेश नाईकांनी कथककल्लीच सुरु केली आहे. अजून तर मी शंभरवेळा जाणार आहे. त्यानंतर माझा बापही येईल", अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. 

आता तुम्हाला आठवेल 'आगरी समाज':

"आगऱ्यांची घरं तोडत होते तेव्हा तुम्ही काय केलं ? त्यांची घरं सुरक्षित राहावी यासाठी तुम्ही काय केलं ? वाढलेली गावठाणं सुरक्षित राहावी यासाठी काय केलं ? नव्या सीमा आखायला पाहिजे होत्या ते का नाही केलं ? आता तुम्हाला आगरी समाज आठवेल आणि आगऱ्यांबद्दल प्रेम जागं होईल. या आगऱ्यांच्या घरात जाऊन किती वेळा जेवलात? कोणत्या सणात सहभागी झालात?," असे प्रश्न आव्हाड यांनी गणेश नाईक यांना विचारले. 

 "नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा.. छैया बघायला तयार रहा... 

झोळी बदलणारे गणेश नाईक:

"राजकारणाची जत्रा झाली आहे असं गणेश नाईक म्हणतात. मात्र जत्रेत ज्या झोळ्या लटकत असतात त्यासारखं  गणेश नाईकांनी राजकारण केलंय. १९९० ते २००० ते एका झोळीवर होते, २००० ते २०१४ पर्यंत एका झोळीवर आणि आता दुसऱ्याच झोळीवर आहेत. त्यामुळे आता ते या झोळीवर किती दिवस राहतील माहित नाही. नवी मुंबईकरांना त्यांचा  था.. था.. थय्याच बघायचा बाकी आहे," अशी खोचक टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केलीये.   

त्यामुळे आता हे ट्विटरयुद्ध अजून किती दिवस चालणार हेच बघणं महत्वाचं असणार आहे. 

Tweeter war between jitendra avhad nad ganesh thakur read all tweets


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tweeter war between jitendra avhad nad ganesh thakur read all tweets