कल्याणमध्ये बारा लाखांची रोकड पकडली 

कल्याणमध्ये बारा लाखांची रोकड पकडली 

कल्याण  : कल्याण पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. 15) रात्री उल्हासनगरच्या दिशेकडून येणाऱ्या एका कारमध्ये 12 लाख 48 हजार रुपयांची रोख रक्कम सापडली.

मुरबाड रोडवरील सुभाष चौकात कल्याण पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजिंक्‍य पडवळ, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांची तपासणी सुरू होती.

भरारी पथक प्रमुख दामोदर साळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साह्याने कारची तपासणी केली. या रकमेबाबत वाहनचालक योग्य तो खुलासा करू शकला नाही. यामुळे ही रक्कम महात्मा फुले पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. या प्रकरणी पुढील पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालयातील समितीमार्फत करण्यात येणार आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com