केरळसाठी 12 ट्रक रवाना, 60 लाखांचे धान्य, कपडे व औषधे 

दिनेश गोगी
रविवार, 26 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : आमदार ज्योती कलानी, युथ आयकॉन ओमी कलानी यांनी केरळसाठी केलेल्या आवाहनाला व त्यासाठी काढलेल्या पदयात्रेला उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी कमालीचा प्रतिसाद देताना 60 लाख रुपये किमतीचे सर्व प्रकारचे धान्य, कपडे, औषधे,  चपला, बूट या सोबतच 5 लाख रुपये रोख मदतीचा हात दिला आहे. या सर्व वस्तूंनी भरलेले तब्बल 12 ट्रक केरळला रवाना करण्यात आले आहेत. 

केरळमध्ये उदभवलेल्या पूरपरिस्थितीमुळे झालेली जीवित व वित्तहानी गृहीत धरून ओमी कलानी यांनी व्यापाऱ्यांना मदतीचा हात देण्याचे आवाहन सोशल मीडियावर केले होते. त्यासाठी बाजारपेठेतून पदयात्रा काढण्यात येणार असे जाहीर केले होते. त्यानुसार आमदार ज्योती कालानी, यूथ आयकॉन ओमी कालानी, नगरसेविका पंचम कलानी, नगरसेवक राजेश वधारिया, युटीए अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, मॅनूफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष पितू राजवानी, अजित माखिजानी, कमलेश निकम, नारायण पंजाबी, राजेश टेकचंदानी, शिवाजी रगडे, राम तनवानी, दीपक छतलानी, संतोष पांडेय, दिलीप मिश्रा, सुंदर मुदलियार, सनी तेलकर पंकज त्रिलोकानी, सोनू पंजाबी, नीरज आदींनी बाजारपेठेतून पदयात्रा काढली. आणि व्यापाऱ्यांनी केरळ मधील पूरग्रस्त नागरिकांसाठी भरभरून मदत दिली.

Web Title: twelve truck arrive from kerla, 60 lakh rupees grain, clothes and medicines