एसीचे तापमान 24 अंशांवर कायम? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - वातानुकूलन यंत्रांची (एसी) निर्मिती करतानाच त्यांचे तापमान 24 अंशांवर कायम ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत. सरकारने एसीच्या तापमानाबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही शिफारस पुढे आली आहे. माणसाच्या शरीराचे तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस असते; पण मोठ्या कंपन्या, हॉटेल, ऑफिस या ठिकाणी एसीचे तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस ठेवले जाते. हे तापमान मानवी आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे लोकांना अंगावर गरम कपडे, ब्लॅंकेट आदी वापरावे लागते. यामुळे ऊर्जा फुकट जाते.

मुंबई - वातानुकूलन यंत्रांची (एसी) निर्मिती करतानाच त्यांचे तापमान 24 अंशांवर कायम ठेवण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यासाठी नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत. सरकारने एसीच्या तापमानाबाबत केलेल्या सर्वेक्षणातून ही शिफारस पुढे आली आहे. माणसाच्या शरीराचे तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस असते; पण मोठ्या कंपन्या, हॉटेल, ऑफिस या ठिकाणी एसीचे तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस ठेवले जाते. हे तापमान मानवी आरोग्यासाठी योग्य नाही. यामुळे लोकांना अंगावर गरम कपडे, ब्लॅंकेट आदी वापरावे लागते. यामुळे ऊर्जा फुकट जाते. जपानसारख्या काही देशांमध्ये एसीचे तापमान 28 अंश सेल्सिअस ठेवण्यासाठी नियम करण्यात आल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. 

केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी देशभरातील एसी बनवणाऱ्या कंपन्यांची बैठक घेतली. या कंपन्यांना एसी बनवतानाच तापमान 24 अंश सेल्सिअस ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. येत्या चार-सहा महिन्यांत याबाबत जनजागृती केल्यानंतर केंद्र सरकारकडून नागरिकांच्या सूचना मागवल्या जातील. यानंतर देशभरात हा निर्णय लागू केला जाणार आहे. 

एसीचे तापमान 21 अंशांपेक्षा जास्त असणे हे चांगले आहे; पण मुंबईसारख्या शहरात 24 अंश तापमान हे समाधानकारक नाही. जर ऑफिसमध्ये तापमान समाधानकारक नसेल तर त्याचा कामावरही परिणाम होऊ शकतो. मुंबईत आर्द्रता जास्त असल्याने थंड वातावरणाची आवश्‍यक आहे. 
- सुदाम करपे, रहिवासी, मुंबई 

एसीचे 24 अंश तापमान हे समाधानकारक आहे. आपल्या शरीराचे तापमान 37 अंश असते. एसी लावल्यावर शरीराचे तापमान कमी होते. ते सामान्य राखण्यासाठी शरीर उष्णता निर्माण करते. यासाठी फार ऊर्जा लागते. शरीरात पुरेशा कॅलरी आणि वजन नसेल तर वजन कमी होऊ शकते. जास्त थंडीमुळे ऊर्जा कमी होणे, स्नायुदुखी आणि थरथरणे या तक्रारीही उद्‌भवतात. 
- डॉ. राजन वालावलकर, ऑर्थोपेडिक सर्जन 

Web Title: twenty-four degrees temperature of AC