मुंबई-गोवा महामार्गावर दोन अपघात ; दोन ठार, पाच जखमी

सुनील पाटकर
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

महाड : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ नडगाव व वहूर येथे झालेल्या एसटी आणि मोटारसायकलच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर पाच जण जखमी झाले आहेत. महाड आणि नांगलवाडी या दरम्यान दुचाकीस्वार एसटीवर येऊन आदळला तर वहुर गावाजवळ एसटी आणि दोन दुचाकीत अपघात झाला.

महाड :  मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ नडगाव व वहूर येथे झालेल्या एसटी आणि मोटारसायकलच्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार झाले तर पाच जण जखमी झाले आहेत. महाड आणि नांगलवाडी या दरम्यान दुचाकीस्वार एसटीवर येऊन आदळला तर वहुर गावाजवळ एसटी आणि दोन दुचाकीत अपघात झाला.

महाडजवळ मुंबई गोवा महामार्गावर राज निवृत्ती तांबे आणि आदर्श जाधव  हे दोन तरुण नव्या दुचाकीने महाडकडे भरधाव येत असताना समोरून येणाऱ्या विठ्ठलवाडी गुहागर या एसटी बसवर दुचाकी आदळल्याने यातील राज तांबे हा रस्त्याकडेला दहा फूट खाली उडाल्याने त्याचा मृत्यु झाला. तर आदर्श हा गंभीर जखमी झाला आहे. दुसऱ्या अपघातात माणगावकडून महाडकडे येणाऱ्या एसटी बसची शेजारून जात असलेल्या दुचाकीला धडक लागली. याच दरम्यान समोरून आलेला दुचाकीस्वार आपटला.

जनार्दन डोंगरे हे आपल्या आपल्या वैष्णवी व वैभवी मनवे या दोन भाचींना घेऊन महाडकडे येत होते तर समोरील बाजूने प्रजाल गावडे आणि सुभाष नाडकर हे दुचाकीवरून महाडकडून तळेगावकडे जात होते. या अपघातात वैष्णवी हि जागीच ठार झाली. तर जनार्दन डोंगरे, वैभवी मनवे, प्रजाल गावडे आणि सुभाष नाडकर असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मूळच्या वहूर येथील रहिवाशी असलेल्या या दोघी बहिणी दहिसरहून दिवाळीनिमित्त गावी मामाकडे टोळ गावी आल्या होत्या. टोळ येथून मुंबईला जाण्यासाठी मोटारसायकलवरून महाडमध्ये येत असताना हा अपघात झाला. मात्र  या अपघाताशी एसटी चालकाने आपला संबंध नसल्याचे सांगतले आहे. शेजारून जाणारे दोन्ही मोटारसायकलस्वार एकमेकांवर आपटल्याचे त्याचे म्हणणे आहे. या अपघाताचा अधिक तपास महाड शहर पोलीस करत आहेत.
 

Web Title: Two accidents on Mumbai-Goa highway; Two killed, five injured