esakal | अडीच तासांची चर्चा गुलदस्त्यात; पार्थ पवार काहीच न बोलता 'सिल्वर ओक' वरून निघाले
sakal

बोलून बातमी शोधा

अडीच तासांची चर्चा गुलदस्त्यात; पार्थ पवार काहीच न बोलता 'सिल्वर ओक' वरून निघाले

आज पार्थ यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

अडीच तासांची चर्चा गुलदस्त्यात; पार्थ पवार काहीच न बोलता 'सिल्वर ओक' वरून निघाले

sakal_logo
By
तुषार सोनवणे

मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे नातू पार्थ पवारांना बुधवारी चांगलेच सुनावले होते. त्यामुळे त्यांच्या वक्त्यव्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आज पार्थ यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

मोठी बातमी! प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली ही माहिती; वाचा सविस्तर

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुशांत सिह राजपूत प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे पार्थ यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. बुधवारी शरद पवार यांना पत्रकारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी प्रश्न विचारले. त्यावेळी  आपल्या नातवाच्या मागणीला आपण कवडीची किंमत देत नसल्याचे खळबळजनक वक्तव्य पवार यांनी केले. त्यामुळे पवार आपल्या नातवायाच्या भूमीकेवर नाराज आहेत का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता. 

शरद पवारांच्या त्या वक्तव्यानंतर बुधवारी अजित पवार यांनी त्यांची मुंबईतील निवासस्थानी 'सिल्वर ओक' वर भेट घेतली. त्यांच्यातही बराच वेळ चर्चा झाली. परंतु त्यांनी याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रीया माध्यमांना दिली नाही. चर्चेनंतर ते तेथून निघून गेले.

कोकणात रेल्वे सोडण्याबाबतचं घोडं अडलंय तरी कुठं? रेल्वे प्रवासी संघटना राज ठाकरेंना भेटणार

आज स्वतः पार्थ पवार यांनीदेखील सिल्वर ओक येथे शरद पवारांची भेट घेतली. ते साधारण अडीच तास सिल्वर ओक येथे होते. अजोबांशी चर्चा झाल्यानंतर ते माध्यमांशी संवाद न साधता निघून गेले, परंतु या भेटी आणि वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात काही वेगळ्या बाबी घडतात का हे येत्या काही दिवसात पाहणं महत्वाचं ठरणार आहे.