नागपूर - आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

खामगाव (नागपूर) : आयपीएलच्या चेन्नई पंजाब सामन्यावर सट्टा घेणाऱ्या नागपूरच्या दोघांना येथील वादग्रस्त प्रेम रेसिडेन्सी हॉटेल मधून रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास  शहर पोलिसांनी अटक केली.

खामगाव (नागपूर) : आयपीएलच्या चेन्नई पंजाब सामन्यावर सट्टा घेणाऱ्या नागपूरच्या दोघांना येथील वादग्रस्त प्रेम रेसिडेन्सी हॉटेल मधून रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास  शहर पोलिसांनी अटक केली.

येथील प्रेम रेसिडेन्सी हॉटेल मध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर बुकी सट्टा घेत असल्याची माहिती मिळाल्यावरून शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष टाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे व कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. यावेळी चेन्नई व पंजाब संघांच्या सामन्यावर सट्टा चालविताना तिघे जण मिळून आले. पोलिसांनी त्यांचा कडून लॅपटॉप, टिव्ही, ८ मोबाईल व इतर साहित्य असा जवळपास ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पंकज गणेश निहाडिया व हेमंत नंदकिशोर उपाध्याय नागपूर, हॉटेल प्रेम रेसिडेन्सीचा मालक प्रदीप राठी यांच्यावर गुन्हा  दाखल करण्यात आला. नागपूरच्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: The two arrested for betting on the IPL