भिवंडीत गोमांसाच्या संशयावरून दोघे अटकेत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

भिवंडी - भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात गोमांसाच्या संशयावरून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 500 किलो मांस जप्त करण्यात आले आहे. पाच कसाई पळून गेले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. शांतीनगर भागातील गैबीनगर रोडवरील चांदणी हॉटेलजवळ बेकायदा गोवंश हत्या करून त्याचे मांस विक्रीसाठी टेम्पोतून नेले जात असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना काल रात्री मिळाली होती. त्या ठिकाणी पोलिस पथकाने छापा टाकून टेम्पोचालक सलीम युसूफ शेख आणि हमाल शहावली अब्दुल जब्बार शेख यांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

Web Title: Two arrested in bhiwandi