चलन तस्करीप्रकरणी दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मुंबई - विदेशी चलनाच्या तस्करीप्रकरणी महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) उल्हासनगरच्या दोघांना अटक केली आहे. त्यातील एकाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडल्यानंतर सव्वा कोटी भारतीय मूल्याचे अमेरिकन डॉलर हस्तगत करण्यात आले. 

कुणाल हरीश बजाज (वय 21) व शंकर आहुजा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कुणाल हा बुधवारी (ता. 20) एक लाख 89 हजार अमेरिकन डॉलरसह विमानतळावर आला होता. त्या वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) त्याला पकडून डीआरआयच्या स्वाधीन केले. आपल्याला आहुजाने या रॅकेटमध्ये आणल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे शुक्रवारी (ता. 22) त्यालाही अटक करण्यात आली. 

यापूर्वी बजाजने विदेशात सहा, तर भारतात 11 फेऱ्या मारल्या आहेत. त्यातून कोट्यवधींच्या चलनाची तस्करी केल्याचे चौकशीत उघड झाले. हे सर्व रॅकेट अहमदाबाद येथून चालवले जात आहे. 

वारीनुसार मोबदला 
बजाज हा एका दुकानात काम करत असताना त्याला आहुजाने या रॅकेटमध्ये आणले. बजाजला देशांतर्गत तस्करीसाठी पाच हजार, तर विदेशवारीसाठी 20 हजार रुपये मिळायचे. 

Web Title: Two arrested in connection with currency smuggling case