कल्याणमध्ये पश्चिम बंगालच्या दोघांना गावठी कट्टासह अटक 

रविंद्र खरात 
मंगळवार, 2 एप्रिल 2019

कल्याण - निवडणुक आचारसंहिता कालावधीत कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी कल्याणमध्ये जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी आणि पेट्रोलिंग सुरू केले आहे. सोमवारी रात्री कल्याण पूर्वमध्ये नाकाबंदी दरम्यान कोळसेवाडी पोलिसांनी दोघांना एका गावठी कट्ट्यासहित अटक केले. पुढील तपास कोळसेवाडी पोलिस करत आहेत.

याबाबत कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहू राजे साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणूक कालावधीत कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांनी रात्रीची नाकाबंदी आणि पेट्रोलिंग, गस्त घालण्यास सुरुवात केली. सोमवार रात्री खडेगोळवली परिसरात संशयास्पद फिरणारे दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचा एक देशी कट्टा, तीन जिवंत काडतुसं आणि एक दुचाकी गाडी हस्तगत करण्यात आली आहे. 

अकबर गुलाम मुस्तफा आणि शेरअली अहमद शेख अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहे. हे दोघेही मूळचे पश्चिम बंगालचे आहेत. आरोपीकडे शस्रे कशी आली, त्यांच्यावर आजूबाजूच्या पोलिस ठाण्यात यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का ? याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाहूराजे साळवे यांनी दिली. 

Web Title: two arrested in kalyan with a gun and bullets