ऑनलाईन फसवणूकप्रकरणी दोघे अटकेत 

ऑनलाईन फसवणूकप्रकरणी दोघे अटकेत 

मुंबई - हर्बल प्रॉडक्‍टच्या नावाखाली ब्रिटनमधील कंपनीची 89 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांना अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.

जयगणेश मोहन पठ्ठे आणि आयकेब ओकोरोको अशी आरोपींची नावे आहेत. त्या दोघांनाही न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

तक्रारदार फार्मास्युटिकल सल्लागार आहेत. जुलैमध्ये त्यांना जीटीबी फार्मास्युटिकल कंपनीकडून ई-मेल आला होता. त्यात "ऍक्वाफेरा' भारतात मिळत असून, तिवारी फ्लुईडस या कंपनीकडून खरेदी केल्यास फायदा होईल असे सांगण्यात आले. आरोपींनी तक्रारदारांना विविध बॅंक खात्यांत पैसे भरण्यास सांगितले होते. त्यानुसार तक्रारदारांनी विविध खात्यांत 89 लाख रुपये भरले. फसवणूक झाल्याचे समजताच तक्रारदारांनी एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली. परिमंडळ-10चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नितीन अलकनुरे, पोलिस निरीक्षक केदारी पवार, सहायक निरीक्षक श्रीनिवास कामुनी यांच्या पथकाने तपास सुरू केला. सीसी टीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून जयगणेशला कोपरखैरणे येथून ताब्यात घेतले. त्याने आयकेब या नायजेरियन साथीदारासोबत फसवणूक केल्याची कबुली दिली. जयगणेशला पार्सल नेण्यासाठी 5-10 हजार रुपये मिळायचे. आयकेबला पोलिसांनी खारघर परिसरातून ताब्यात घेतले. आयकेबने जयगणेशच्या मदतीने तक्रारदारांना 80 लिटर हर्बलचे पार्सल पाठवले होते. दोघांनी गुन्हा कबूल केला. आयकेब दोन वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहे. या टोळीने पंजाब, दिल्ली येथे तेलाचे पार्सल पाठवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com