दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

खोपोली : खालापूर-पेण मार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघे जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. 30) रात्री घडली. संतोष कातकरी आणि कमलाकर पवार अशी ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

दोघा जखमी तरुणांवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. खालापूर-पेण मार्गावरील सावरोली येथे रविवारी रात्री दोन भरधाव दुचाकी एकमेकांसमोर आल्याने हा अपघात घडला. ही टक्कर इतकी जोरात होती की यात दुचाकींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
 
Web Title: Two bikes hit face to face Two killed