Video : धावत्या लोकलमध्ये स्टंट करणे पडले तरुणांना महागात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

मुंबई : धावत्या लोकलमध्ये स्टंट करणे दोन तरुणांना महागात पडले आहे. रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये स्टंट करतानाचा दोन युवकाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई : धावत्या लोकलमध्ये स्टंट करणे दोन तरुणांना महागात पडले आहे. रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये स्टंट करतानाचा दोन युवकाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान या जीवावर बेतणारी स्टंटबाजी करणाऱ्या या दोन स्टंटबाज युवकांना गुरुवार (ता.1) अटक केले आहे<

चेंबूर ते वडाळा दरम्यान, रेल्वेच्या हार्बर मार्गावरील लोकलमध्ये दोन युवक दरवाजामध्ये उभे राहून स्टंट करत होते. याच लोकलमध्ये जीआरपीचे कर्मचारी प्रवास करत होते.  त्यांनी या तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिले. 

दरम्यान, वडाळा लोहमार्ग पोलिसांनी जीवावर बेतणारी स्टंटबाजी करणाऱ्या या दोन स्टंटबाज तरुणांना अटक केली आहे.  मोसिन मोहम्मद असे एका तरुणाचे नाव आहे. मोसिन आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two boys arrested for performing dangerous stunts on Mumbai local train